भुसावळ शहर आक्रोश मोर्चाने दणाणले


संविधान आर्मी संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात भुसावळात अर्धनग्न मोर्चा

भुसावळ : दीपनगरातील इंडीवेल कंपनीने सहाशे कामगारांना थकीत वेतन द्यावे, दीपनगर प्रकल्पात भुसावळ शहर व तालुक्यातील स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळावा, भुसावळातील रस्त्यांची दुर्दशा थांबवावी, भुसावळकरांच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात तसेच रेल्वे हद्दीतील अतिक्रमण धारकांना हक्काची जागा देवून सातबारा त्यांच्या नावावर करावा आदी प्रमुख मागण्यांसाठी संविधान आर्मी संस्थापक अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या प्रमुख नेतृत्वात शहरात सोमवार, 6 रोजी दुपारी अडीच वाजता अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने शहर दणाणले. शहर हद्दीत आंदोलक आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशीरापर्यंत बाजारपेठ पोलिसात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घोषणाबाजीने शहर दणाणले
मागण्या पूर्ण करा अन्यथा खुर्ची खाली करा, शहराचा विकास झालाच पाहिजे, कामगारांना थकीत वेतन मिळालेच पाहिजे आदी प्रकारच्या घोषणा आंदोलकांनी देत शहर दणाणून सोडले. दीपनगर प्रकल्पापासून शेकडो कामगार पायी चालत जुन्या पालिका कार्यालयासमोर जमले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरूवात करण्यात आली. बसस्थानक, बाजारपेठ पोलीस ठाणेमार्गे आंदोलक शहर पोलीस ठाणे हद्दीत आल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.




यांचा आंदोलनात सहभाग
माजी नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे, पीआरपी उत्तर महाराष्ट्र प्रमुख राकेश बग्गन, पीआरपी अल्पसंख्यांक आघाडी जिल्हाप्रमुख आरीफभाई शेख, श्री छत्रपती सेना जिल्हाप्रमुख गोपी साळी, फेकरी उपसरपंच सुनील ठाकूर, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हा उपाध्यक्ष गजानन चर्‍हाटे, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हाप्रमुख हरीष सुरवाडे, जिल्हा महासचिव चंदू पहेलवान, भारतीय ओडबसम क्रांती जिल्हाध्यक्ष जयराम भार्गव, भारतीय टिपू सुलतान सेना जिल्हाप्रमुख इरफानभाई शेख, संविधान आर्मी युवा जिल्हाप्रमुख राहुल साळुंखे, भारतीय जय सेवालाल सेना युवा जिल्हाध्यक्ष श्रीराम राठोड, छोटू सोनवणे, हिरालाल सोनवणे, मनोहर पवार, गोलू पवार, विनय कुमार, अरुण कुमार, पवन कुमार, आनंद पवन पवार, दिनेश शहा, बंटी कुमार, निर्मल राठोड, भैय्या राम, ब्रिजकिसन, तन्वीर यादव, सुनील चव्हाण, ब्रिजेश चव्हाण, सीताराम मंडल, बालवीन बलवीर, दीपलेश सिंग, खानशीत अन्सारी, दीपक बीन, धनंजय प्रसाद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मजदूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, मोर्चानंतर माजी नगरसेवक जगन सोनवणे, माजी नगरसेविका पुष्पा जगन सोनवणे यांच्यासह पदाधिकार्‍यांविरोधात बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा कोविड नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !