हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण उघडले


तापी काठावर प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. धरणात 53.30 टक्के जलसाठा असून प्रति सेकंद 1441 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ तासात 8.3 मिलिमीटर पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणतून पाणी सोडण्यात आल्याने तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हतनूर धरणातून आज सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होणार : तापी काठावर सतर्कतेचा इशारा






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !