रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस : शेतकर्‍यांमध्ये समाधान


रावेर : शहर व तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणाावर विजांचा कडकडात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. रावेर शहरासह परीसरात मुसळधार पावसाला विजांच्या कडकडाटात सुरूवात झाली असून गेल्या अनेक महिन्यांनी जोरदार पावसाने हजेरी लावली. आधीच तालुक्यातील भोनक नदी व नागोई नदी वाहण्यास सुरुवात झाली आहे तसेच मात्रान नदी व सुकी नदी वाहण्याच्या प्रतीक्षेत आहे. मूसळधार पावसाने अद्याप कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !