मेहुणबारे शिवारातून पशूधनाची चोरी


चाळीसगाव : तालुक्यात पशूधन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून तालुक्यातील मेहुणबारे शिवारातून 36 हजार रूपये किंमतीच्या तीन गायी आणि तीन वासरू अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकर्‍याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतातून पशूधनाची चोरी
मेहुणबारे शिवारातील तिरपोळे रोडवर दीपक दगा गढरी (45, रा. मेहुणबारे, ता.चाळीसगाव) यांच्या शेतातील शेडमध्ये त्यांच्या मालकीच्या 36 हजार रूपये किंमतीच्या तीन गायी आणि तीन वासरू 6 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते 7 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. दीपक गढरी यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार अरुण पाटील करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !