वाळूच्या जप्त ट्रॅक्टर-ट्रॉली लांबवल्या : दोघांविरोधात निंभोरा पोलिसात गुन्हा


रावेर : तालुक्यातील निंभोरासीम शिवारातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे टॅ्रक्टर-ट्रॉली महसूल विभागाने जप्त केली मात्र जप्त केलेले वाळूचे दोन ट्रॅक्टर-ट्रॉली मोकळ्या जागेवरून चोरून नेल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर तालुक्यातील निंभोरा शिवारात बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असताना तलाठी भाग्यश्री किशोर बर्वे यांनी कारवाई करीत ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्या निंभोरासीम विटवा रस्त्याला लागून मोकळ्या जागेत जमा केल्या होत्या. ही कारवाई 14 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता करण्यात आली मात्र मोकळ्या जागेवर लावलेले दोन ट्रॉल्यांसह टॅ्रक्टर संशयीत आरोपी शामा एकनाथ अटकाळे आणि ब्रिजलाल रामू सवर्णे (निंभोरा, ता.रावेर) यांनी चोरून नेल्याप्रकरणी तलाठी भाग्यश्री बर्वे यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील सहा.निरीक्षक स्वप्नील उन्ननवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बापू पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !