शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा घरोघरी जावुन केला सत्कार


माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील व मित्रांनी शिक्षकांचा केला सन्मान

यावल : यावल नगर परीषदेचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी रविवार, 5 सप्टेंबर 2021 च्या शिक्षक दिनाचे औचित्य साधुन यावल शहरातील विविध भागात राहणार्‍या गुरुजनांचा त्यांच्या घरोघरी जाऊन शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.शहरातील साधारणपणे 78 शिक्षकांना तथा सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षिकांचा या शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मानीत करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.
या अनोख्या शिक्षक सन्मानित कार्यक्रमात यावल नगरपरीषदेचे नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते एजाज देशमुख, हाजी फारुख मोमीन, गणेश महाजन, आशिष पाटील, शब्बीर तडवी, गणेश जोशी, मोसीन कुरेशी, भरत कोळी, प्रशांत पाटील, उदय पाटील यांनी या सन्मानित कार्यक्रमात आपला सहभाग घेतला. अतुल पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी राबवलेल्या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षकांनी आनंद व्यक्त करून त्यांचे आभार मानले. यावेळी अतुल पाटील यांचे गुरू तथा आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचाचे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.बी.तडवी यांनी आपले शिष्य अतुल पाटील यांनी केलेले कार्य हे अतुलनीय असल्याचे म्हटले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !