रावेरात बेशिस्त फळगाड्या लावणार्या विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई
रावेर : नियम डावलून वाहने चालवणार्यांसह वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धत्तीने फळगाड्या लावणार्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहिम पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या नेतृत्वात गुरुवारपासून सुरू करण्यात आली असून एकूण 42 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक हा शहराचा मध्यवर्ती भाग असून येथे मुख्य बाजारपेठ व लागून नागरी वस्ती आहे. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असून अपघाताच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडलेल्या आहेत. मनमानी पद्धतीने वाहनचालक वाहने चालवतात. याची दाखल पोलीस निरीक्षक नागरे यांनी घेतली आहे. येथील पोलीस ठाण्याचा 15 दिवसांपूर्वी पदभार घेतल्यावर शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे.
रावेरात पथसंचलन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागातर्फे निरीक्षक नागरे यांच्या नेतृत्वात शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पथसंचलन करण्यात आले. गुरुवारी डॉ.आंबेडकर चौकात पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत 36 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली तर वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या 16 फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांचे तराजू काटे पोलिसांनी जप्त केले आहेत. कारवाईच्या मोहिमेत सहा.निरीक्षक शीतलकुमार नाईक, उपनिरीक्षक सचिन नवले, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, कर्मचारी महेंद्र सुरवाडे, मुकेश सोनवणे, प्रदीप सपकाळे, सोनू तडवी, सचिन घुगे, मनोज मस्के, संदीप घ्यार, अमोल जाधव यांच्यासह आरसीपी प्लाटूनचा सहभाग होता.




