देशावरील कोरोनाचे संकट टळू द्या : आमदार संजय सावकारे यांचे विघ्नहर्त्या चरणी साकडे


भुसावळ : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली असलीतरी कोरोनाचे संकट मात्र कायम आहे. शहरासह देशावरील कोरोनाचे संकट मिटावे, सर्वत्र सुख-शांती समाधानाचे वातावरण रहावे, बळीराजाला सुगीचे दिवस यावेत, असे साकडे विघ्नहर्त्या चरणी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी घातले. शुक्रवारी आमदारांच्या निवासस्थानी शाडू मातीच्या गणरायाची स्थापना मोठ्या भक्तीभावाने करण्यात आली. आमदार संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकारे यांच्याहस्ते श्रींची पूजा-अर्चा करण्यात आली. प्रसंगी कन्या सुनिधी सावकारे व आई सुशीलाबाई सावकारे उपस्थित होत्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !