जळगावात दुचाकी लांबवली
जळगाव : गोलाणी मार्केट परीसरातून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन वासुदेव जाधव (21, रा.रेणुका नगर, मेहरूण, जळगाव) हे 8 सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने शहरातील गोलाणी मार्केटमध्ये दुचाकी (एम.एच.19 डी.एच.3361) ने दुपारी 4 वाजता दत्तमंदीराच्या पार्किंग केली होती. रात्री नऊ वाजता दुचाकीजवळ आले असता दुचाकी न आढळल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहेत.




