रुग्णाच्या मृत्यूनंतर यावल पालिकेला जाग : डेंग्यू रोखण्यासाठी धुरळणी


यावल : शहरातील विस्तारीत वसाहतीतील गणपती नगरातील 23 वर्षीय आदिवासी तरुण सादीक गनी तडवी (23) या तरुणाचा शनिवार, 11 रोजी उपचार सुरू असताना डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूनंतर यावल पालिका प्रशासनाने डेंग्यू रोखण्यासाठी जंतूनाशक धूरळणी सुरू केली आहे. सादीक तडवी या तरुणाला डेंग्यूचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र शनिवारी या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर यावल शहरात मोठी खळबळ उडाली.

यावल शहरात धुरळणीला वेग
यावल नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, नगरसेवक तथा गटनेते अतुल पाटील, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी स्वच्छता विभागाला नागरी वस्तीत तत्काळ जंतुनाशक फवारणीचे आदेश दिल्यानंतर रविवारपासून यावल शहरातील बाबानगर परीसरातून जंतुनाशक धुर फवारणीस सुरुवात करण्यात आली. यावल नगरपरीषदेचे स्वच्छता निरीक्षक दिलीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शेख मंजर शेख अजगर, रामदास घारू व आदी कर्मचारी यात धूर फवारणी मोहिमेत सहभागी झाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !