नाहाटा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परीषदेचे आयोजन
भुसावळ : कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा महाविद्यालयात मॉडर्न टेक्निक्स अॅण्ड प्रॅक्टिसेस इन कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंट या विषयावर आंतरराष्ट्रीय परीषद झाली. उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील वाणिज्य अधिष्ठाता प्रा.डॉ.पी.पी.छाजेड उपस्थित होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे होत्या. गुरुकुल कांग्री युनिव्हर्सिटी हरीद्वार उत्तराखंड येथील अधिष्ठाता डॉ. व्ही.के.सिंग, पाकिस्तान कराची येथील मोहम्मद फैज अहमद किद्वाई, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी. गोस्वामी, परीषदेचे संयोजक डॉ.एन.ई.भंगाळे, संघटन सचिव प्रा.डॉ.रश्मी शर्मा इत्यादी उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉ.व्ही.के.सिंग यांनी व्यवस्थापन शाखेतील आधुनिक व्यवस्थापनाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक परीषदेचे संयोजक डॉ.एन.ई.भंगाळे यांनी केले तर प्रमुख पाहुणे यांचा परीचय डॉ.पी.के.पाटील यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ.रश्मी शर्मा तर आभार प्रा.सपना कोल्हे यांनी मानले.



समारोपास यांची उपस्थिती
समारोप कार्यक्रमात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील प्राचार्य प्रा.अरविंद चौधरी यांनी समारोप केला. या समारोपाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी इत्यादी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. खिलेश पाटील यांनी केला तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन परिषदेचे संयोजक प्रा.डॉ.एन.ई.भंगाळे यांनी मानले. या परीषदेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.डॉ.एन.ई.भंगाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
परीषद यशस्वीतेसाठी विभागातील सर्व आयोजन समिती सदस्य डॉ.एन.ई.भंगाळे, प्रा.डॉ.रश्मी शर्मा, डॉ.पी.के.पाटील, प्रा.के.पी.पाटील, डॉ.ममता पाटील, प्रा.स्मिता बेंडाळे, सपना कोल्हे, प्रा.खिलेश पाटील, प्रा.भूषण चौधरी, प्रा.स्वाती शेळके, प्रा.हेमंत सावकारे, बापू वारके यांचे सहकार्य लाभले.


