आपले मानवाधिकार फाऊंडेशनतर्फे आमदार निलेश लंके यांचे स्वागत
भुसावळ : शहरात विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त आलेले पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार निलेशजी लंके यांचे स्वागत आपले मानवाधिकार फाऊंडेशचे तालुकाध्यक्ष मयूर अंजाळेकर यांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन केले. यावेळी आमदार लंके यांच्या आमदार निधीसाठी 11 हजारांची रोख रक्कम देण्यात आली. मयूर अंजाळेकर यांनी केलेल्या कामाचे आमदार निलेश लंके यांनी कौतुक केले.





