मुक्ताईनगरात कोळी समाजातर्फे गुणवतांचा सत्कार
मुक्ताईनगर : कोळी समाज आर्थिक व राजकीय दृष्टीने पुढे आला असलातरी शैक्षणिकदृष्टीनेही मोठे होणे गरजेचे असल्याचे मत कोळी समाजाचे नेते माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी येथे व्यक्त केले. आदिवासी कोळी युवक मंच, मुक्ताईनगर तालुका यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवारी गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष व कोळी समाजाचे नेते अशोक कांडेलकर, जिल्हा परीषद गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे, रावेर पंचायत समिती सभापती कविता हरलाल कोळी, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील, नगरसेवक निलेश शिरसाठ, अॅड.वसंत भोलाणकर, डॉ.दिवाकर पाटील, नितीन कांडेलकर, गोपाळ सोनवणे, संजय कांडेलकर, चंद्रकांत भोलाणे, संजय कोळी, सुरेश कोळी, हरलाल कोळी, राजेंद्र कांडेलकर, गुणवंत पिवटे, संतोष कोळी व कोळी युवक मंचचे अध्यक्ष पंकज कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश तायडे कुंड यांनी केले. यशस्वीतेसाठी आदिवासी कोळी युवक मंच मुक्ताईनगरचे पंकज कोळी, शंकर मोरे, उमेश तायडे, अॅड.संतोष कोळी, शुभम तायडे, विष्णू कोळी, शुभम कोळी, भूषण कोळी, रुपेश कोळी, अर्जुन सांगळकर, अक्षय ठाकरे, आदर्श भोलाने, सौरभ कोळी, मनोज तायडे, कृष्णा कोळी, सुकलाल सांगळकर , लखन कोळी, गोकुळ भोलाणे आदींनी परीश्रम घेतले.




