कुर्हा येथे अपंग बांधवांना प्रमाणपत्रांचे वाटप
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग महिला व पुरुषांना कुर्हा-वढेादा जि.प.गटातर्फे नवनीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना उप तालुका प्रमुख नवनीत पाटील, शिवसेना शहरप्रमुख पंकज पांडव, सतीश नागरे,प ुंडलिक सरक, सोशल मीडिया विभाग प्रमुख दीपक वाघ, कुर्हा युवा सेना प्रमुख अविनाश वाढे, उपशाखा प्रमुख पंकज धाबे, राहुल खिरळकर, अकबर मिस्तरी, शेख रहिस, शेख फारुख, लहू घूळे, निलेश पाटील, रशीद तडवी, श्रावण धाडे, रीतेश मुळंतकर, जि.प.गटातील अपंग बांधव व आदी शिवसैनिक उपस्थित होते.




