भुसावळात मोकाट कुत्र्यांनी घेतला तीन बालकांना चावा


भुसावळ : शहरातील शिवशक्ती हुडको कॉलनी व परीसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांनी दोन दिवसांत तीन बालकांचे लचके तोडले. यामुळे परीसरात भीतीचे वातावरण आहे. जामनेर रोडवरील शिवशक्ती हुडको कॉलनी भागात वाहनांच्या खाली किंवा आडोशाला लपून असलेले मोकाट कुत्रे पादचार्‍यांवर थेट हल्ला चढवतात. गेल्या दोन दिवसांत भाग्यश्री विपुल साळुंके (वय 5), पार्थ मराठे (वय 4) व अन्य एका बालकास मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. परिसरातील नागरिकांनी धाव घेवून बालकांना वाचवले. या घटना पाहता पालक लहान मुलांना अंगणात खेळण्यासाठी देखील सोडत नाही. रहिवाशांनी हातात लाठ्या-काठ्या घेवून अनेकवेळा मोकाट कुत्र्यांना हाकलून लावले. मात्र, त्यांचा उपद्रव तरीही कमी झालेला नाही. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी असली तरी पालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही.

जखमी बालकांवर उपचार
शहरातील पालिकेच्या संत गाडगेबाबा रुग्णालयात यापूर्वी श्वान दंशावरील रेबीजची लस उपलब्ध नव्हती. मात्र, सध्या हा साठा आहे. त्यामुळे शहरातील तिन्ही जखमी बालकांवर पालिका दवाखान्यात उपचार करण्यात आले. यासाठी परिसरातील रहिवासी मंगेश पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बतरा यांनी सहकार्य केले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !