कंडारीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आमदार लंकेंनी केली स्वच्छता


अस्वच्छता पाहताच कंडारीत ग्रामपंचायत प्रशासनाला फटकारले

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे नगर-पारनेर मतदारसंघाचे आमदार नीलेश लंके यांनी भुमिपूजन कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी गावातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परीसरात झालेली अस्वच्छता पाहून त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला खडे बोल सूनावून स्वत:च पाण्याची बाटली घेवून पुतळ्याची स्वच्छता केली.

महामानवाच्या पुतळ्याला केले नमन
10 कोटी रुपयांच्या निधीतून कंडारी-साकेगाव जिल्हा परीषद गटात विकासकामांचे भूमिपूजनासाठी सोमवारी आमदार लंके भुसावळात आले होते. ऑनलाईन भूमिपूजन कार्यक्रमानंतर त्यांनी विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी आमदार अमोल मिटकरी उपस्थित होते. कंडारी येथील भेटीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास नमन करताना त्यांनी अस्वच्छतेच्या प्रश्नावर बोट ठेवले. ग्रामपंचायत प्रशासनासह सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी याकडे लक्ष वेधले पाहिजे, असे सांगून त्यांनी गाडीतून सिलबंद पाण्याची बाटली काढून स्वत:च पुतळ्याची पाण्याने स्वच्छता केली तसेच परीसराचीही स्वच्छता करुन घेतली. या त्यांच्या कृतीतून मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलीच चपराक बसली. कंडारी गावात याबाबत दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !