यावलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणारे तिघे सुदैवाने बचावले
यावल : वेगवेगळ्या घटनेत शहर व तालुक्यातील तिघांनी सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात दोन महिला आणि 32 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. सुदैवाने तिघांना वेळीच येथील ग्रामीण रुग्णालयांत दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचवले. शहरातील आझाद नगरातील रहिवासी 32 वर्षीय विवाहित तरुण सय्यद आबीद सय्यद सगीर याने सोमवारी सायंकाळी नैराश्यामुळे भुसावळ रस्त्यावरील पाटचारी उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पाटचारीत पाणी कमी असल्यामुळे तो बचावला. या भागातील शेतमजूर मदतीला आले तसेच या भागातून जाणारे येथील न.पा. गटनेते सय्यद युनूस यांना थांबवत माहिती दिली. यानंतर सय्यद युनूस यांनी तरुणास यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शहरातील 40 वर्षीय विवाहितेनेही विष प्राशन केले. तर थोरगव्हाण येथील ज्योती देवचंद भालेराव (45) यांनी किरकोळ वादातून विषारी औषध प्राशन केले मात्र वेळीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.





