नशिराबाद टोलनाका उद्यापासून सुरू होणार : वाहनांसाठी असा आहे टोल
जळगाव : बुधवार, 15 सप्टेंबरपासून नशिराबाद टोलनाक्यावरून टोलवसुलीला सुरुवात होत असून याबाबत कुठल्या वाहनासाठी किती दर आकारले येणार या संदर्भात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दरांबद्दलची सार्वजनिक सूचना जारी केली.
असा भरावा लागणार टोल
कार, प्रवासी व्हॅन, जीप, हलके मोटार वाहनाच्या एकेरी प्रवासाठी 85 तर एका दिवसात परतीचा प्रवासासाठी 130 रुपये आकारले जाणार आहे. त्याशिवाय हलके वाणिज्य वाहन, हलके मालवाहू वाहनाच्या एकेरी प्रवासासाठी 140 रुपये तर परतीच्या प्रवासासाठी 210 रुपये़, ट्रक व बस एकेरी प्रवासाठी 295 तर परतीच्या प्रवासासाठी 440, खोदकाम करणारी, माती वाहून नेणारे उपकरणे, जड बांधकाम यंत्रांच्या एकेरी प्रवासाठी 460 व एका दिवसाच्या परतीचा प्रवासाकरिता 690 रुपये आकारले जाणार आहे तर अवजड वाहनांना एकेरी प्रवासाठी 560 रुपये मोजावे लागणार आहे.



परतीच्या प्रवासासाठी 25 टक्के
सर्व वाहनांसाठी टोल तिकीट घेतल्यापासून 24 तासांसाठीचा परतीच्या प्रवासाठी 25 टक्के सूट देण्यात आली़ त्याचबरोबर सर्वप्रकारच्या वाहनासांठी टोलशुल्क भरल्याच्या तारखेपासून एका महिन्याकरिता 50 किंवा जास्त एकेरी प्रवास असल्यास त्यात 33 टक्के सूट मिळणार आहे. टोलनाक्याच्या 20 कि.मी. हद्दीतील अवाणिज्य वाहनांसाठी कॅलेंडर महिन्यासाठी स्थानिक पास हा 285 रुपयांचा असेल.


