दामिनी वैदकरची सासरच्यांकडून हत्या : कुटुंबीयाचा आरोप


सखोल चौकशीसाठी आमदार निलेश लंके व आमदारसंजय सावकारे यांना निवेदन

भुसावळ : भुसावळातील माहेर व जळगाव येथील सासर असलेल्या दामिनी वैदकर हिने 27 ऑगस्ट रोजी गळफास घेतला होता. सासरच्या लोकांनीच तीचे जीवन संपवले असून विवाहितेने आत्महत्या केली नसून तर सासरच्यांनीच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयानी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी रामानंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे यांच्याकडे असून एकतर्फी तपास होत आहे. मयत दामिनीचे वडील, आई, बहिण, भाऊ यांचा अद्यापही जबाब नोंदविण्यात आला नाही. तपासात मुद्दाम दिरंगाई केली जात आहे. यामुळे तपासी अधिकारी राजेश शिंदे यांच्याकडून सदरचा तपास काढुन वरीष्ठ पालीस अधिकार्‍याकडे सोपविण्यात यावा तसेच सदरचा खटला चालविण्यासाठी सरकारी वकील अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडीत कटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी पारनेरचे आमदार निलेश लंके व आमदार संजय सावकारे यांची भेट घेवून करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत ईब्टा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष एस.एस.अहिरे, बी.वाय.सोनवणे, एस.एन इंगोले, सुजीत पालवे, शरद पाटील, आर.आर.कापडणे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !