ओबीसी आरक्षणासाठी वरणगावात भाजपाचे आंदोलन : आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी


वरणगाव : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळायला पाहिजे या मागणीसाठी वरणगाव मंडळ कार्यालयावर भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी मोर्चा काढत महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ओबीसींचे आरक्षण दिल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला.

आंदोलनात यांचा सहभाग
या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, जिल्हा उपाध्यक्ष हाजी अल्लाउद्दीन सेठ, मिलिंद भैसे, संतोष शेळके, डॉ.सादिक अरुण बावणे, जिल्हाध्यक्ष विवेक शिवरामे, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, भाजपा उपाध्यक्ष नटराज चौधरी, फहिम शेख, बाळू कोळी, रमेश पालवे, ज्ञानेश्वर घाटोळे, ईरफान पिंजारी, पप्पू ठाकरे, आकाश निमकर, महिला आघाडी अध्यक्षा प्रणिता पाटील-चौधरी, कृष्णा माळी, शहराध्यक्ष डी.के.खाटीक, मुस्लिम अन्सारी फहिम शेख, सिराज शेख, संगीता माळी, पालवे, मंदा थटार, गंगुबाई माळी, जयश्री अवतारे, नीता तायडे, कस्तुरा इंगळे, राहुल जंजाळे, गोलू वंजारी, अशपाक खाटीक, नथ्थू कोळी, के.के.अंभोरे, गंभीर माळी, कमलाकर मराठे, विशाल कुंभार, प्रताप दिव्यवीर, दीपक चौधरी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तलाठी कल्पना गोरले, संजय साईतवाल उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !