लग्नाच्या आमिषाने 20 वर्षीय तरुणीवर पालला अत्याचार
रावेर : मध्यप्रदेशातील एका गावातातील 20 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवत पाल, ता.रावेर येथे अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार अत्याचार
मध्य प्रदेशातील एका गावातील 20 तरुणी नाशिक येथे मजुरीसाठी आल्यानंतर तिची गुलाम रसुल नवाज तडवी (25, पाल, ता.रावेर) याच्याशी ओळख झाली व नंतर दोघांमध्ये संपर्क वाढली. तीन महिन्यांपूर्वी गुलाम तडवी याने पीडीत मुलीला 02 जून 2021 रोजी भेटण्यासाठी बोलाविले. त्यानुसार मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी नेले. तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा 9 सप्टेंबर रोजीदेखील पीडीत तरुणीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पीडीत तरुणीने मध्यप्रदेशातील छीपाबड पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा रावेर पोलिसात वर्ग करण्यात आला. तपास डीवायएसी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




