सावदा पालिकेतर्फे निर्माल्य व मूर्ती दान करण्याचे आवाहन


सावदा : श्री विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले असून सावदा पालिकेने निर्माल्य व मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेश तसेच घरगुती गणेश विसर्जन याबाबत शासनाने नेमून दिलेल्या निर्बंधामुळे विसर्जनाच्या ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याकरीता तसेच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षणासाठी सावदा नगरपरीषदेने ‘माझी वसुंधरा अभियान’ महाराष्ट्र शासन व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत सावदा नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्टेशन रोड, सावदा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुडांची निर्मिती /सोय करण्यात आली आहे. ज्या नागरीकांना या ठिकाणी विसर्जनासाठी जाणे शक्य होणार नाही, अशा नागरीकांकरीता सावदा नगरपालिकेने मोठा आड, इंदिरा गांधी चौक, गांधी चौक येथे श्री गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. नगरपरीषदेमार्फत संकलन केलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत विसर्जन करण्यात येईल. सावदा शहरवासीयांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव पाहता विसर्जन ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन नगरपरीषदेने उपलब्ध करून दिलेल्या गणेश विसर्जन कुंड तसेच गणेश संकलन केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावदा पालिकेतर्फे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !