सावद्यात शांततेत श्री विसर्जन


सावदा : शहरात अनंत चतुर्थीच्या दिवशी रविवार, 19 रोजी शांततेत व अत्यंत धार्मिक वातावरणात श्री गणेश विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच शहरातील घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणपतींचे कोविडच्या पार्श्वभूमीवर कोणतेही वाद्य न लावता थेट विसर्जनथळी आणण्यात आले. गत दोन वर्षांपासून गणपती विसर्जनाच्या भव्य मिरवणूका नसल्या तरी धार्मिक वातावरण व घोषणांच्या गजरात गणरायास भावपूर्ण निरोप देण्यात आला. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींचे हतनूर धरणावर विसर्जन करण्यात आले. यावेळी शहरात सहा.निरीक्षक देविदास इंगोले, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड व सर्व पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाने चोख बंदोबस्त राखला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !