पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली तीन मजली इमारत


पाचोर्‍यातील घटना : सुदैवाने जीवीतहानी टळली

पाचोरा : बांधकामातील तांत्रीक दोषांमुळे शहरातील बाहेरपुरा भागातील तीन मजली इमारत रात्री कोसळली. सुदैवाने जीवीतहानी टळली. बांधकाम करतांना गेल्या पाच वर्षांपुर्वी काही तांत्रिक दोष राहिल्याने शहरातील बाहेरपुरा भागात तीन मजली इमारत कोसळली. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. शहरातील व्ही.पी.रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपुर्वी बांधकाम केली होती मात्र या इमारतीला पावसाने तडा पडल्यानंतर भाडेकरू यांनी इमारत रीकामी केली.

अचानक कोसळली इमारत
रीमझिम चालणार्‍या पावसाने सोमवार, 20 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली सुदैवाने यात जीवीत हानी झाली नाही. यापूर्वी नगरपरीषदेने हा रोड बंद केला होता. काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. परीसरातील आणि शेजारी राहणार्‍या नागरीकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने जीवीतहानी झाली नाही.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !