भुसावळात उद्या ओबीसी परीषदेबाबत बैठक


भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील आनंद लॉनमध्ये बुधवार, 22 रोजी सायंकाळी पाच वाजता ओबीसी परीषदेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरात ओबीसींच्या प्रश्नावर राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर आरक्षण काढण्यात आल्याने हे आरक्षण नेमके का काढण्यात आले, कश्यामुळे हा प्रकार घडला हे सर्वजून घेण्यासाठी व एकता मजबूत करण्यासाठी जळगाव जिल्हास्तरीय ओबीसी परीषद घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंघर्षच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत आगामी 25 सप्टेंबर रोजी होणार्‍या ओबीसी परीषदेबाबत चर्चा केली जाणार आहे. उपस्थितीचे आवाहन भुसावळ ओबीसी आरक्षण हक्क समितीतर्फे करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !