31 हजारांचे सागवान लाकूड जप्त : वनविभागाची कारवाई


यावल : यावल तालुक्यातील हरीपुरा व जामुनझिरा रस्त्यालगत असलेल्या शेताच्या खड्ड्यातून 31 हजार रुपये किंमतीचे सागवान लाकूड जप्त करण्यात आले. याप्रकरणी यावल पश्चिम वनपरीक्षेत्र विभागात अज्ञातांवर वनगुन्हा दाखल करण्यात आला. यावल तालुक्यातील मौजे हरीपुरा ते जामुनझीरा रस्त्यालगत केळीच्या शेताजवळ खड्ड्यात केळीचे पाला-पाचोळा झाकून सागवानी लाकूड लपवण्यात आल्याचे आढळून आले. लाकडाचे मोजमाप केले असता 31 हजार रुपये किंमतीचे असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई वनसंरक्षक डी.डब्ल्यू.पगारे, उपवनसंरक्षक एच.एस.पद्मनाभा, विभागीय वन अधिकारी यु.जी. वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षण पी.व्ही.हाडपे, व्हि.टी.पदमोर, वनपाल राजू शिंदे, रवींद्र तायडे, असलम खान, रज्जाक तडवी, वनमजूर अशोक जिरेमाळी, शिवाजी इंगळे, राजू भोईटे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !