नशिराबाद टोल नाक्यावर स्थानिक रोजगार द्यावा
जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची मागणी
भुसावळ : नशिराबाद टोल नाक्यावर स्थानिक सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा व टोलनाक्याच्या 20 किलोमीटर परीसरातील वाहन धारकांना टोल माफी द्यावी, अशी मागणी बुधवार, 22 रोजी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष विवेक नरवाडे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष इस्माईल गवळी, युवक काँग्रेसचे नितीन पटाव, खान्देश ठेवीदार संघटनेचे प्रवीण पाटील, भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष सागर कुरेशी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून काम करणार : चाळीसगावचे नूतन अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांची ग्वाही





