राजुरा येथील पोलीस पाटील बडतर्फ


कुर्‍हा, ता.मुक्ताईनगर : येथूनच जवळ असलेल्या राजुरा गावातील पोलीस ाटील वृषाली वसंत भोलाणकर यांना आपल्या पदावरून बडतर्फ करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. वृषाली वसंत भोलाणकर (राजुरा) यांची 19 मे 2016 रोजी राजुरा गावज्ञच्या पोलीस पाटील आरक्षित (एस.टी.) या पदावर नियुक्ती करण्यात आली मात्र पाच वर्षे उलटूनही त्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र बाबत कार्यालयात कोणतेही कागदपत्र सादर केले नाही. जात पडताळणी संबंधित कोणतेही पुरावे सादर नसतांना त्यांचे पद 11 मे 2021 ते 30 एप्रिल 2031 या तारखेपर्यंत वाढवून देण्यात आले मात्र संबंधित कार्यालयाकडून पोलीस पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शासन निर्णयानुसार आरक्षित पदावर पोलीस पाटील यांची नियुक्ती केल्यानंतर नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र सादर केलेले नाही. राजुरा गावातील सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष संजय कांडेलकर (राजुरा) यांनी उपविभागीय अधिकारी, भुसावळ व पोलीस निरीक्षक, मुक्ताईनगर यांच्याकडे 23 जून 2021 रोजी तक्रारी अर्ज केल्यानंतर संबंधित अधिकारी यांनी चौकशी करून वृषाली वसंत भोलाणकर यांना गुरुवार, 16 सप्टेंबर 2021 रोजी पोलीस पाटील या पदावरून बडतर्फ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !