फैजपूर पालिकेचे आरोग्य निरीक्षक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा
फैजपूर राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान यांची मागणी
फैजपूर : पालिकेत मुख्याधिकार्यांच्या दालनात नगरसेवकांशी अरेरावी करणार्या आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांच्यावरिशिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते शेख कुर्बान शेख करीम यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बुधवारी मुख्याधिकारी यांच्या दालनात दुपारी पाच वाजता 5 ते 6 नगरसेवक शहरातील केरकचरा व गटारी तुंबल्यामुळे तक्रार करण्यासाठी आले असता आरोग्य निरीक्षक लक्ष्मण चावरे यांनी नगरसेवकांशी अरेरावी केली त्यामुळे नगरसेवकांचा अपमान झाल्याच्या भावनेतून नगरसेवक शेख कुर्बान यांनी चावरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना नोटीस देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.





