लेटर बॉम्बने खळबळ : रावेर वैद्यकीय अधीक्षकांची गडचिरोलीत बदली होण्यासाठी दिले बनावट पत्र


रावेर : रावेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.एन.डी.महाजन यांची बनावट स्वाक्षरी व शिक्क्याचा वापर करून प्रिन्सीपल सेक्रेटरी, मुंबई यांच्याकडे गडचिरोली येथे बदली करण्यासंदर्भात अज्ञातांनी पत्र पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डॉ.एन.डी. महाजन यांनी रावेर पोलिसांत तक्रार दाखल घडल्या प्रकारामागे असलेल्या दोषींचा शोध घेवून कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे.

झारीतल्या शुक्राचार्याचा शोध घेण्याची मागणी
रावेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.एन.डी.महाजन यांनी कोरोना काळात अतिशय जबाबदारीने कार्य पार पाडले. यामुळे वेळेत ऑक्सिजन व उपचार करात आल्याने अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले मात्र डॉ.महाजन यांच्या कामाच्या पद्धती आणि ग्रामीण रुग्णालयात कुणाचा हस्तक्षेप खपवून घेण्यास त्यांचा मज्जाव असल्याने त्यांना यंत्रणेतून विरोध झाल्याचे काही प्रकार अलीकडच्या घडले असतानाच लेटर बॉम्ब प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. खोटे लेटरपॅड व मेडिकल ऑफिसर, रुरल हॉस्पिटल, रावेर या नावाचा खोटा शिक्का तयार करून प्रिन्सीपल सेक्रेटरी, मुंबई यांच्याकडे खोट्या सहीने मेळघाट किंवा गडचिरोलीमध्ये बदली करून मिळावी, अशी मागणी करण्यासंदर्भात पत्र देण्यात आल्याची बाब उघडकीस आल्याने खळबळ उडाली. मुळात डॉक्टरांनी असे कुठलेही पत्र दिले नसताना अज्ञातांनी हा प्रकार केल्याने डॉक्टरांनी पत्राची नक्कल आणि त्यावरील जावक नंबर घेऊन पोलिसात तक्रार केली. या पत्रावरील जावक क्रमांक देखील खोटा आहे तर पत्र देखील त्यांच्याकडे टाईप केलेले नसल्याचे डॉ.महाजन यांचे म्हणणे आहे.सदरील पत्र 11 जून रोजी पाठवण्यात आले आहे. घडल्या प्रकारामागील दोषींचा शोध घेवून कारवाईची मागणी होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !