केळीवर आलेल्या सीएमव्ही व्हायरसची भरपाईची तहसीलदारांकडे मागणी
रावेर : केळीवर आलेल्या सीएमव्ही व्हायरस व कपाशीवर आलेल्या लाल्या रोगाची झालेल्यया लागणमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चातर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन नायब तहसीलदार सी.जी.पवार यांना देण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, सरचिटणीस सी.एस.पाटील, महेश चौधरी, पंचायत समिती सदस्य जुम्मा तडवी, राहुल महाजन, पराग पाटील, प्रशांत वाणी, रजनीकांत बारी आदी भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.





