नशिराबादमधील खून प्रकरणील अटकेतील आरोपींकडून दोन धारदार चाकू जप्त
भुसावळ : पूर्ववैमनस्यातून भुसावळातील तरुणाचा नशिराबाद येथे दोघा आरोपींनी खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी नशिराबाद उड्डाणपुलाखाली घडली होती. आरोपींच्या हल्ल्यात धम्मप्रिय सुरळकर (20, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला होता तर संशयीत आरोपी समीर शेख जाकीर आणि शेख रेहान नईम यांना मंगळवारी रात्री 11 वाजता अटक करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले होते. आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून खुनात वापरलेले दोन चाकू जप्त करण्यात आले. दरम्यान, अटकेतील दोघा आरोपींना जळगाव न्यायालयाने 27 सप्टेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.





