रावेरात सिनेस्टाईल पाठलागानंतर चोरटा जाळ्यात
रावेर : शहरातील छोरीया मार्केटमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दुकान फोडून चोरी झाल्यानंतर पळ काढणार्या चोरट्यांचा पोलिसांनी अर्धा किलोमीटरपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केल्यानंतर एका चोरट्याला पकडण्यात यंत्रणेला यश आले तर अन्य एक चोरटा पळण्यात यशस्वी झाला. रावेर शहरात शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास छोरीया मार्केटमध्ये दोन दुकान फोडण्यात आल्यानंतर याचवेळी गस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम कांगने यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला शोध घेण्याचा प्रयत्न करताच दोन चोरटे धूम ठोकून पळताना दिसताच त्यांनी सुमारे अर्धा किमी सिनेस्टाईल पाठलाग करून एका चोरट्याला पकडले तर दुसरा चोरटा पसार होण्यात यशस्वी झाला. अटकेतील चोरटा जाड्या बारेला हा मध्यप्रदेशातील झिरण्याचा रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले.





