दिल्ली हादरली : न्यायालय आवारात गँगस्टरची हत्या : वकिलाच्या वेशात आलेले शुटर्स ठार


नवी दिल्ली : दिल्लीतल्या रोहिणी कोर्ट परीसरात जितेंद्र गोगी नामक गुन्हेगाराची वकीलाच्या वेशात आलेल्या शुटर्सनी गोळी झाडून हत्या केली तर पोलिसांच्या प्रत्त्युत्तरात दोघे शुटर्स ठार झाले आहे. या घटनेने दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे. या शूटआऊटमध्ये चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.

वकीलाच्या वेशात आले शुटर्स
सूत्रांच्या माहितीनुसार, हल्लेखोर हे टिल्लू गँगचे शूटर असून ते वकिलाच्या वेशात दिल्लीतील रोहिणी कोर्टात गँगस्टर जितेंद्र गोगीला शुट करण्यासाठी आले होते. शुटर्सने अचानक केलेल्या गोळीबारात जितेंद्र गोगी जागीच ठार झाला तर पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई करत शूटर्सचा एन्काऊंटर केला. ही घटना रोहिणी कोर्टाच्या रूम नंबर-207 मध्ये घडली. गँगस्टर गोगी आणि टिल्लू गँगमधील पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली आहे. दरम्यान कोर्टाच्या परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.





जितेंद्र गोगी गँगस्टर
जितेंद्र गोगी हा दिल्लीतील टॉप मोस्ट गँगस्टर होता. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर चार लाखांचे बक्षीस ठेवले होते तर हरीणाया पोलिसांनी देखील गोगीवर अडीच लाखंचे बक्षीस ठेवले होते. दिल्लीच्या नरेला परिसरात एक स्थानिक नेता वीरेंद्र मान यांच्या हत्याकांडात जितेंद्र गोगी आणि त्याच्या गँगचा सहभाग होता. जितेंद्र उर्फ गोगी वर हरीयाणाची प्रसिद्ध सिंगर हर्षिता दाहियाच्या हत्येचा देखील आरोप होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !