रावेर तहसीलचे गौडबंगाल : खरीप अनुदानाची माहिती देण्यास नकारघंटा कायम
रावेर : रावेर तालुक्यातील शेतकर्यांना वाटप करण्यात आलेले खरीप अनुदान 2019 ची माहिती दडपण्याचा धक्कादायक प्रकार रावेरात घडत असून माहिती आधिकार कायद्याला सुध्दा तिलांजली देण्याचे काम सुरु आहे. खरीप अनुदान वाटपात भ्रष्ट्राचार झाल्याचा संशय आहे. याकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लक्ष घ्यालण्याची गरज आहे. भाजपा सरकारने 2019 मध्ये रावेर तालुक्यातील शेतकर्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता व खरोखर बाधीत असलेल्या शेतकर्यांना हा निधी वर्ग करण्याच्या सूचना होत्या. प्रत्यक्ष अनुदान वाटप वादाच्या भोवर्यात असून अनुदान वाटप करण्या संदर्भातील महत्वाची माहिती दडपली जात आहे. प्रस्तुत प्रतिनिधीला अवलोकनात महत्वाची माहिती जाणून-बुजुन दाखवली जात नसल्याचा प्रकार घडत आहे.





