भुसावळातील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा थांबवा


भुसावळ : शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा थांबवावा व दोन फिडर कार्यान्वीत करावेत, अशी मागणी जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागातर्फे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. गत वर्षांपासून शहरात खंडित विजेची समस्या निर्माण झाली असून एमआयडीसीतून शिवाजी नगर, खडका रोड, नसरवांजी फाईल, आगा खान वाडा, गडकरी नगर, मिल्लत नगर, मोहम्मदी नगर, लक्ष्मी नगर आदी भाग एका फिडर जोडण्यात आले असून वारंवार खंडित वीजपुरवठ्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. या भागात आणखी एक फिडर सुरू झाल्यास या समस्येतून नागरीकांची सुटका होणार असल्याचा आशावाद मो.मुन्वर खान यांच्यासह भुसावळ शहर काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष सलीम गवळी, जिल्हा उपाध्यक्ष मेहबूब खान, शहर उपाध्यक्ष संतोष सालवेजानी गवळी, अजिंक्य जैन आदींनी वर्तवला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !