विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत अन्य स्पर्धांमध्ये भाग घेवून यश मिळवावे


पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे : विघ्नहर्ता माझा बाप्पा भव्य चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

भुसावळ : कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही मात्र वाणी दाम्पत्याने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील मरगळ दूर होण्यास मदत झाली असून त्यांच्यातील कलागुणही समोर आले आहे. शहरात असे उपक्रम राबवण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत अन्य खेळ व स्पर्धांमध्ये रूची दाखवून यश मिळवावे, असा आशावाद भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथे व्यक्त केला. भुसावळातील नगरसेविका मेघा देवेंद्र वाणी व समाजसेवक देवा वाणी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘विघ्नहर्ता माझा बाप्पा’ या विषयावर गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील गुणवंतांना नुकतेच पारीतोषिक देवून गौरवण्यात आले. दोन वयोगटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत 170 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना गौरवताना पोलीस उपअधीक्षक वाघचौरे बोलत होते.

दोन्ही वयोगटातील स्पर्धकांचा गौरव
स्पर्धेत यशस्वी झालेल्या प्रथम द्वितीय व तृतीयक्रमांकाच्या दोन्ही वयोगटातील स्पर्धकांना मानचिन्ह व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.




यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत साहेब, नगरसेवक प्रा.सुनील नेवे उपस्थित होते.

असे आहेत स्पर्धेतील विजेते
लहान वयोगट, प्रथम- रुद्र मनोज खंडागळे, द्वितीय- सेजल राहुल बर्‍हाटे, तृतीय- आर्या रवींद्र चौधरी व मोठ्या वयोगटात प्रथम- सोनाली उमाकांत शर्मा, द्वितीय- सुजल दीपक फालक व तृतीय- दर्शना ताराचंद शर्मा. दरम्यान, परीक्षक म्हणून ताप्ती पब्लिक स्कूलचे चित्रकला शिक्षक हर्षानंद सोनवणे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन मुकेश चौधरी तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी निहाल बोरोले, गौरव झांबरे, मयुर सोनार तसेच अलंकार मंडळाच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !