शेतात तुटलेल्या विद्युत तारेचा शॉक लागल्याने शेतकर्‍याचा मृत्यू


पाचोरा : शेतात शेळी चारत असतांना पिकांमध्ये तुटून पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून पाचोरा तालूक्यातील कळमसरा येथील शेतकर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवार, 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली. मधुकर नेटके (55) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. अल्पभूधारक शेतकरी शेत शिवारात आपली शेळी चारण्यासाठी गेले असतांना शेळी अचानक पळाल्याने शेळी मागे पळत असतांना याच परीसरात कापूस पिकात जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत तारा व त्यातील प्रवाहाने या शेतकर्‍याला जोरदार शॉक (करंट) लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवार, 24 रोजी सायंकाळी कळमसरा शिवारात ही घटना घडली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !