लोहार्‍यात अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त


सावदा : रावेर तालुक्यातील लोहारा येथे अवैध गावठी दारूची भट्टी सावदा पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी उद्ध्वस्त केली. लोहारा गावात संशयीत आरोपी मुशीर नजीर तडवी हा गावापासून जवळच असलेल्या अंतरावर बेकायदेशीररीत्या गावठी दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना मिळाली. त्यानुसार सावदा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार मेहरबान तडवी, रीजवान पिंजारी, जयराम खोडपे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक ठेंगडे, नितीन पाटील, सागर देशमुख यांनी कारवाई करत 10 हजार रुपये किंमतीची 1 हजार लिटर गावठी दारू नष्ट केली. या प्रकरणी संशयित आरोपी मुशीर तडवी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !