नात्याला काळीमा : आठ वर्षीय मुलीवर अत्याचार ; नराधम पित्यास अटक


नागपूर : पिता-पूत्रीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना उपराजधानीत घडली. नराधम पित्याने आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केला तसेच आपल्या भावाच्या सात वर्षीय मुलासोबतही अनैसर्गिक कृत्य केले. शुक्रवारी रात्री या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली.

विकृतीमुळे पत्नीनेही सोडलेघर
40 वर्षीय संज्या नामक नराधमाच्या कारनाम्यामुळे पत्नीसह त्याच्या भावाची पत्नीने घर सोडल्याने संज्याची आठ वर्षीय मुलगी, त्याचा भाऊ, भावाचा 7 वर्षीय मुलगा आणि वृद्ध आई असे पाच जण हुडकेश्वरमधील घरात राहतात. संज्याचा भाऊ चौकीदारी तर आई घरगुती काम करते. हे दोघे बाहेर गेल्यानंतर नराधम संज्या स्वत:च्या मुलीवर आणि पुतण्यावर वासना शमवत असल्याची बाब उघड झाली आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता अचानक संज्याची वृद्ध आई घरी परतली. तिने दार ढकलून बघताच नराधम चिमुकलीवर अत्याचार करताना दिसताच वृद्धेने आरोपी संज्याला लाथ मारली व दोन्ही नातवांना घराबाहेर आणले. वृद्धा संतापाच्या भरात शिवीगाळ करताना बघून शेजार्‍यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. वृद्धा दोन्ही चिमुकल्या नातवांना घेऊन हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. ठाणेदार सार्थक नेहते आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हा संतापजनक प्रकार ऐकून लगेच घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !