लग्नानंतरही प्रेमिका छळत असल्याने तरुणाची प्रेमिकेच्या घरात आत्महत्या


नवी दिल्ली : गर्लफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून विवाहित असलेल्या प्रियकराने गर्लफ्रेंडच्या घरातच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या बारां शहरात पाच दिवसांपूर्वी एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येप्रकरणी आता त्याच्या गर्लफ्रेंडला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. राजकुमार असे मयत तरुणाचं नाव आहे.

त्रासामुळे तरुणाची आत्महत्या
पोलीस अधिकारी मांगेलाल यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी मोतीलाल कुम्हार यांनी तक्रार केली होती. त्यांनी आपला मुलगा राजकुमार यांना 20 सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजता घरातून बाहेर पडला. त्यानंतर रात्री दोन वाजता एक तरुणी घरी आली आणि राजकुमारचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. राजकुमारचे शेजारी राहणार्‍या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तरुणीला राजकुमारसोबत लग्न करायचं होतं. पण त्याने जवळपास पाच महिन्यांपूर्वीच एका दुसर्‍या मुलीशी लग्न केलं. यामुळे तरुणी नाराज झाली होती. याच कारणामुळे या दोघांमध्ये सतत भांडण व्हायची. 20 तारखेला देखील त्यांच्यात मोठा वाद झाला. यातूनच गर्लफ्रेंडला वैतागून राजकुमारने तिच्याच घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची अधिक चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !