वीज तार तुटून अंगावर पडल्याने 5 बकर्‍यांचा मृत्यू


सावदा : येथून जवळच असलेल्या कोचुर खुर्द गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विजेचा खांबावरील तार तुटून पाच बकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी बकर्‍यांना चारण्यासाठी नेत असतांना हा अपघात घडला. कोचुर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात विजेचा खांबावरील तार तुटून अचानक चरण्यासाठी जात असलेल्या 5 बकर्‍यांवर पडली. यात गौतम तायडे यांच्या मालकीच्या तीस हजार किंमतीच्या तीन, युवराज तायडे यांच्या मालकीची सात हजार किंमतीची एकतर संतोष तायडे यांच्या मालकीची सात हजार किंमतीची एक अशी अंदाजे 44 हजार रुपयांच्या बकरींचा मृत्यू झाला. महावितरणच्या गलथान कारभारानेच आमचे नुकसान झाल्याचा आरोप करत संबधितांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. महावितरणच्या कारभार विरोधात वातावरण तापल्याने सावदा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक देविदास इंगोले हे आपल्या पथकासह लागलीच घटनास्थळी झाले. त्यांनी संबधितांची समजूत घालून वातवरण शांत केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !