बलात्कारातील आरोपीचे पलायन : कर्तव्यात कसुरी करणार्‍या तीन पोलिसांचे निलंबन


पुणे : लहान मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाल्याप्रकरणी तीन पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना वारजे पोलिस ठाण्यात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा कसून शोध घेत त्यास दुसर्‍या दिवशी जेरबंद केले मात्र कामात हलगर्जीपणा केल्यामुळे वारजे पोलीस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचा आदेश पोलिस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दिले. पोलिस हवालदार संभाजी गायकवाड, पोलिस नाईक महेश धोत्रे व पोलिस शिपाई विशाल कदम अशी निलंबित कर्मचार्‍यांची नावे आहे. वारजेत चार वर्षाच्या मुलीवर 28 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर आरोपी स्वागत कांबळे यास पोलिसांनी 17 सप्टेंबर रोजी अटक केली होती मात्र पोलिस झोपल्याची संधी साधून पळून गेला होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !