चोरट्यांनी कन्नड घाटातून दुचाकी लांबविली
चाळीसगाव : तालुक्यातील लोंढे येथील तरुणाची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी कन्नड घाटातून चोरी गेली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मांगु राठोड (25, रा.लोणजे, ता.चाळीसगाव) हे कामाच्या निमित्ताने गुरुवार, 23 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कन्नड घाटाच्या पहिला वळणावर त्यांनी दुचाकी (एम.एच.19 डी.एफ. 5168) पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेले 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी गणेश राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे करीत आहे.
