रावेर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात महापुरूषांचा अनादर : पीआरसी सदस्य महादेव जानकरांकडून दखल


रावेर : रावेरच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील महापुरुषांच्या अनादर प्रकाराची दखल आम्ही घेतली असल्याचे पंचायत राज समिती सदस्य तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.पंचायत राज समिती सोमवार, 27 सप्टेंबरपासून जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमिवर जिल्हा परीषद जळगाव ते पंचायत समिती रावेर सर्व दूर स्वच्छता रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे. विविध विकास कामांच्या योजनेची पडताळणी सुरू असताना रावेर गटशिक्षणाधिकारी विभागात पूज्य साने गुरूजी, मदर टेरेसा, माजी पंतप्रधान राजीव गांधी आदी महापुरूषांच्या प्रतिमा केव्हाही कोसळण्याची स्थिती असल्याबाबत वास्तव वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

पंचायत राज समितीने भेट देण्याची गरज
रावेर गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील महापुरूषांच्या प्रतिमा केव्हाही कोसळण्याची शक्यता असून पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके अस्ताव्यस्त पडल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले होते विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देणारी शिक्षण व्यवस्था प्रचंड अस्वच्छतेच्या कोंडीत सापडली आहे. या कार्यालयात रोज गटशिक्षणाधिकारी येऊन बसतात परंतु त्यांना या गोष्टीचे जराही गांभीर्य नसल्याने पंचायत राज समितीने या कार्यालयाला भेट देण्याची मागणी सुज्ञ नागरीकांमधून व्यक्त होत आहे.




अनादर प्रकाराची दखल : माजी मंत्री जानकर
पंचायत राज समिती दौर्‍याचे गांभीर्य लक्षात न घेता रावेरात शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमेचा झालेला अनादर गंभीर बाब असून याची दखल पंचायत राज समिती सदस्य तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी घेतली आहे. झालेल्या प्रकार अतिशय गंभीर असून त्याची आम्ही दखल घेतल्याचे जानकर यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !