उपखेड शिवारात शेती साहित्याची चोरी : तिघे चोरटे जाळ्यात
चाळीसगाव : तालुक्यातील उपखेड शिवारातील शेतकर्याच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटारीची चोरी झाली होती. या प्रकरणी मेहुणबारे पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथील शेतकरी उद्धव अरुण मगर (37) यांचे व खेड शिवारात शेती आहे. जवळच गिरणा नदी पात्रात त्यांनी पाण्याचे इलेक्ट्रिक मोटर बसवले आहे. त्यांच्यासह इतर शेतकर्यांनी देखील काही विद्यूत पंप त्या ठिकाणी लावलेल्या आहेत. दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पाण्याची इलेक्ट्रिक मोटर आणि केबल वायरींची चोरून नेली होती. या संदर्भात उद्धव मगर यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील संशयीत आरोपी भैय्या उर्फ गणेश निंबा पाटील (28), सोन्या उर्फ दिनेश नथू ठाकरे (21) आणि दिगंबर निंबा खैरनार (23, सर्व राहणार उपखेड, ता.चाळीसगाव) यांना 24 सप्टेंबर रोजी मेहुणबारे पोलिसांनी अटक केली. त्यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिघांची न्यायालयालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
