केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेसचे रस्ता रोको आंदोलन


चाळीसगाव : केंद्र सरकारने कृषी धोरणाच्या विरोधात पारीत केलेले काळे कृषी कायदे त्वरीत मागे घ्यावेत या मागणीसाठी चालवलेल्या शेतकरी उपोषणाला पाठिंबा म्हणून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंद साठी चाळीसगाव तालुका महिला काँग्रेस, तालुका काँग्रेस व सेवादल तर्फे कचेरी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी विरोधी काळे कायदा त्वरीत मागे घ्यावेत या आशयाचे निवेदन चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे साहेब यांना देण्यात आले. यावेळी महिला अध्यक्षा सुवर्णा पोळ, तालुकाध्यक्ष अनिल निकम, सेवादल अध्यक्ष आर.डी.चौधरी, माजी आमदार ईश्वर जाधव, राहुल मोरे, रवींद्र पोळ, रवींद्र जाधव, अलताफ खान जमशेर खान, प्रदीप देशमुख, प्रा.एम.एम.पाटील, आर.जे.पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, भगवान पाटील, धनंजय चव्हाण, नितीन पाटील, शिवलाल साबणे, सुमनबाई मोची, अजय पोलडीया, देविदास खरटमल, बापू चौधरी, लताबाई पगारे, लताबाई वाणी, मंदा सूर्यवंशी, सुमनबाई मोची, पूजा मोची, सुमनबाई नंगवारे आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !