चहा विक्रेत्या महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
जळगाव : एमआयडीसी परीसरात चहाची विक्री करणार्या 45 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परीसरात एका ठिकाणी चहाची विक्री करण्याचे काम 45 वर्षीय महिला करते. दरम्यान या चहाच्या टपरीवर रविवार, 26 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अंकुश साईदास चव्हाण (समतानगर, जळगाव) याने विना परवानगी दुकानात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत अश्लिल शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी अंकुश चव्हाण यांच्याविरोधात तक्रार दिल्यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहेत.
