जातीचे नाव घेता, जातीवंत पेटून उठले, घेऊन धगधगत्या मशाली, जातीचे राजकारण पेटले : चाळीसगावात राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले


मानवीय मूल्ये उद्ध्वस्त करणार्‍या प्रत्येक व्यवस्थेच्या विरोधात कविता विद्रोह पुकारते : विद्रोही कवी साहेबराव मोरे

चाळीसगाव : स्व.भास्कर देवराम अहिरे स्मृती प्रतिष्ठान व जेसीआय चाळीसगाव सिटी मार्फत आयोजित निमंत्रित कवींचे राज्यस्तरीय काव्य संमेलन सिनियर कॉलेजच्या मेहता मेमोरीयल हॉलमध्ये नुकतेच झाले. संमेलन अध्यक्ष विद्रोही कवी साहेबराव मोरे यांनी कवितेच प्रयोजन काय असावं याविषयी मत व्यक्त करीत असताना माणसाला केंद्रस्थानी ठेवून माणसाची वकीली करणारे साहित्य निर्मितीचा आग्रह धरला.

कवी व लेखकांचा सन्मान
प्रास्ताविकात डॉ.प्रसन्न अहिरे यांनी स्व.भास्कर देवराम स्मृती प्रतिष्ठा मार्फत फिरते रूग्णालय सुरू करण्यात येईल तसेच वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. आजही महात्मा फुले यांचे विचार महत्वाचे असून त्यांचे आचरण होत नाही ही खंत उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. या काव्य संमेलनात खान्देश साहित्य परीषद म.रा.पुरस्कृत खान्देशातील प्रौढ कवी व कथा लेखकास पुरस्कार प्रदान करण्यात आले. औदुंबर प्रौढ काव्य पुरस्कार लातूर विभागीय माजी सचिव शशिकांत हिंगोणेकर यांना तर यावलचे रमजान तडवी यांना शब्दभास्कर कथा पुरस्कार त्यांच्या रानमेवा कथा संग्रहाला मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या कविसंमेलनास महाराष्ट्रातील कवी सहभागी झाले. आई, बाप, कोरोना, महापूर, शेतकरी आत्महत्या आदी विषयावर कविता सादर करण्यात आल्या.

यांचा संमेलनात सहभाग
सुरेश अहिरे, नाशिक, डॉ.अक्षय पाटील, सुरत, पूजा ठाकुर, कोल्हापूर, पूनम भेडसे, धुळे, गोकुळ देवरे, नंदुरबार, सुनील गायकवाड, गौतमकुमार निकम, एकनाथ गोफणे, प्रा.अशोक वाबळे, गीतांजली गजबे, सिल्लोड, गोविंद पाठक, बीड, अशोक जाधव, शिरपूर, रमेश पोतदार, सोमेश्वर कासार आदींनी रसिक मने जिंकत टाळ्या मिळवून दाद घेतली. याप्रसंगी जेसीआय चाळीसगावचे माजी अध्यक्ष बाबा पवार, बहाळचे नगराज माळी, जॉगींग ट्रॅकचे प्रा.खूशाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड योद्ध्यांचा गौरव
जेसीआय अध्यक्ष डॉ.प्रसन्न अहिरे व सचिव चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांनी स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले, कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कवी गौतम कुमार यांनी केले, पाहुण्यांचा परिचय व शब्द वाचन आभार प्रदर्शन मोजक्या शब्दात सुनील गायकवाड यांनी केले. आयोजन समितीचे प्रमुख दिनेश चव्हाण, गौतम कुमार निकम व पुरस्कार समितीचे प्रमुख सुनील गायकवाड, जेसीआय व खान्देश साहित्य परीषद व प्रमुख प्रायोजक स्व.भास्कर देवराम अहिरे स्मृती प्रतिष्ठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

काही कवींच्या निवडक शब्दातील कविता-

लहानपणी बापानं खूप होतं बडवलं, खरं सांगतो गड्यांनो त्यानेच मला घडवलं.

-दिनेश चव्हाण, चाळीसगाव

जातीचे नाव घेता, जातीवंत पेटून उठले, घेऊन धगधगत्या मशाली, जातीचे राजकारण पेटले,
-गीतांजली गजबे, सिल्लोड

सुनील गायकवाड यांनी ‘पाहुणा; उना ही अहिराणी रचना गायली,

अश्रूंनी भिजली भूमी, आपले उरले न कुणी
-भीमराव सोनवणे, एरंडोल

एकनाथ गोफणे, नितीन खंडाळे, रमजान तडवी यांनी, अहिराणी, गोरबोली, तडवी बोलीतून सादरीकरण केले.

बाप हा बाप असतो, समजवणारा, रागावणारा,
-तबस्सुम कौसर, परभणी

पुन्हा पेटणार आहे, नाविण्याच्या कणाकणात
-पूनम बेडसे, धुळे

अश्या अनेक कवितेतून दर्जेदार शब्दांच्या सरी कवींनी बरसवल्या.

  • ही बातमी वाचली का- जि.प.सिंचन विभागातील गौण खनिज घोटाळ्यांची व्याप्ती प्रचंड : घोटाळ्याच्या चौकशीसाठी पीआरसी समितीला साकडे 

मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !