अंगावर वीज कोसळल्याने 13 वर्षीय मुलीचा मृत्यू
जळगाव : मुसळधार पाऊस सुरू असतानाच अंगावर वीज कोसळल्याने तालुक्यातील विटनेर शिवारात शेतात राहणार्या 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. सोमवार, 27 सप्टेबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोनाली राजेंद्र बारेला (13, रा.विटनेर ता. जि.जळगाव) असे मयत मुलीचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील विटनेर येथील तरूणी विटनेर शिवारातील शेतात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास शेतात असतांना तिच्या अंगावर कोसळल्याचा तिचा जागीच मृत्यू झाला. जळगाव येथील एस.यु.पाटील यांच्या शेतात राहणारा रवींद्र भीमसिंग बारेला यांच्याकडे साधारण एक ते दीड महिन्यापासून सोनाली राजेंद्र बारेला राहत होती. विटनेर पोलिस पाटील डॉ.साहेबराव धुमाळ यांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात आणला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात आली.
